Mhada Project (File Photo)
मुंबई

8 More SRA Projects MHADA | आणखी 8 झोपु प्रकल्प म्हाडा राबवणार

रखडलेले प्रकल्प झोपु प्राधिकरण ताब्यात घेणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : रखडलेले 17 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) राबवण्याचा निर्णय झालेला असताना आता आणखी 8 प्रकल्प म्हाडाकडे देण्यात येणार आहेत. हे प्रकल्प रखडल्यामुळे संबंधित विकासकांकडून ते काढून घेतले जात आहेत.

मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प इतर प्राधिकरणांमार्फत पूर्ण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर म्हाडाच्या भूखंडांवरील 24 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प म्हाडाला देण्यात आले. त्यापैकी काही प्रकल्प व्यवहार्य ठरत नसल्याने केवळ 17 प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला. यापैकी कुर्ला, चेंबूर आणि जोगेश्वरी येथील एकूण 3 प्रकल्पांसाठी झोपु प्राधिकरणाने म्हाडाला हेतूपत्र दिले आहे.

हेतूपत्र दिलेल्या 3 प्रकल्पांमध्ये एकूण 600 झोपड्या आहेत. या प्रकल्पांच्या मंजुरीसाठी म्हाडाने गृहनिर्माण विभागाने प्रस्ताव पाठवले आहेत. म्हाडाला नव्याने देण्यात येणार्‍या 8 प्रकल्पांत साधारण 22 हजार झोपड्या आहेत.

हे प्रकल्प झोपु प्राधिकरणाने आपल्या ताब्यात घेतले आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये झोपु प्राधिकरण नियोजन प्राधिकरण असल्याने प्रकल्प राबवण्यापूर्वी त्याचा आराखडा झोपु प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT