Maharashtra tiger death
दीड वर्षात राज्यात 66 वाघांचा मृत्यू झाला. 
मुंबई

दीड वर्षात राज्यात 66 वाघांचा मृत्यू; गतवर्षी 51 वाघांनी सोडला श्वास

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : स्वतःचे संरक्षण करण्यास वाघ तरबेज असला, तरी मागील दीड वर्षात विविध कारणांमुळे राज्यातील सुमारे 66 वाघ मृत्युमुखी पडल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सन 2023 मध्ये राज्यात 26 वाघांचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाला आहे. अपघातामुळे 10, विषबाधा 2, विद्युत प्रवाह 9, तर शिकारीमुळे 4 अशा एकूण 51 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशाप्रकारचे वाघांचे मृत्यू टाळण्यासाठी वाघांच्या संरक्षणासाठी सरकारने ‘वाईल्ड लाईफ क्राईम सेल’ची स्थापना केली असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

मे 2024 अखेर नैसर्गिकरीत्या 8, अपघात 2, तर विद्युत प्रवाहामुळे 1 वाघाचा मृत्यू झाला आहे. 5 वाघांचा मृत्यू कशामुळे झाला? याचा तपास सुरू असून, या वर्षात आतापर्यंत एकूण 16 वाघांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये वन्यप्राण्यांपासून रक्षणासाठी तारेचे कुंपण बांधून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडतात. शिवाय, अनेक शिकारीसुद्धा शिकारीसाठी विद्युत प्रवाहाचा वापर करतात. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विद्युत प्रवाहामुळे 22 वाघांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील वन्यप्राण्यांच्या गुन्हे प्रकरणांची अद्ययावत माहिती ठेवण्याकरिता नागपूरमध्ये वन्यजीव गुन्हे कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सायबर सेलच्या माध्यमातून शिकारीच्या घटनांमधील आरोपींचा शोध घेतला जात आहे, असेही या अधिकार्‍याने सांगितले.

SCROLL FOR NEXT