Mumbai Police Promotion pudhari photo
मुंबई

Mumbai Police ACP Promotion: मुंबई पोलीस दलातील अन्य ४३ पोलीस अधिकार्‍यांना एसीपी म्हणून बढती

दोन दिवसांत ६१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक झाले सहाय्यक पोलीस आयुक्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई पोलीस दलातील अन्य ४३ पोलीस अधिकार्‍यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती देऊन त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत ६१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त झाले आहेत.

गुरुवारी सकाळी मुंबई पोलीस दलातील ११० पोलीस अधिकार्‍यांना सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यात अठरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक तर ९२ पोलीस निरीक्षकांचा समावेश होता.

या बदलीनंतर संबंधित सर्व पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या. शुक्रवारी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी उर्वरित ४३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती दिली. तसेच त्यांच्या नव्याने पोस्टिंगचे आदेश जारी केले होते. बढती आणि बदल्या झालेल्यांमध्ये पुढीलप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे.

सशस्त्र पोलीस दलाचे श्रीमंत बचाराम शिंदे, अनिल रामचंद्र आव्हाड यांची अनुक्रमे विशेष शाखा एक व सशस्त्र पोलीस कोष, उत्तर नियंत्रण कक्षाचे रविंद्र परमेश्‍वर अडाणे, चारकोप पोलीस ठाण्याचे विनायक उत्तमराव चव्हाण यांची गुन्हे शाखा, गुन्हे शाखेच्या सुवर्णा विजय अडसुळ, सुनिल काशिनाथ चंद्रमोरे यांची गुन्हे शाखा, संरक्षण व सुरक्षा विभागाचे महेंद्र बाळशिराम मोरे.

राजेश रघुनाथ कासारे, मंदाकिनी रामचंद्र नरोटे, संजय सदाशिव सागवेकर, जुबेदा मोहम्मद रजा शेख यांची अनुक्रमे सायन, पूर्व नियंत्रण कक्ष, उत्तर नियंत्रण कक्ष व संरक्षण व सुरक्षा, निर्मलनगर पोलीस ठाण्याचे रमेश चिमाजी वाघ यांची पश्‍चिम नियंत्रण कक्ष, मानखुर्द पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु अरुण घोरपडे यांची मध्य नियंत्रण कक्ष, वाहतूक विभागाच्या जयश्री जितेंद्र गजभिये, आनंद परशुराम हाके, सायरस ओमन ईराणी यांची अनुक्रमे सशस्त्र पोलीस कोष व वाहतूक विभाग.

आंबोली पोलीस ठाण्याचे प्रमोदकुमार श्रीराम कोकाटे यांची देवनार विभाग, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अनघा अशोक सातवसे यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, विशेष शाखा दोनचे प्रसाद जगन्नाथ साटम आणि मनिषा किशोर पाटील यांची विशेष शाखा दोन, विमानतळ पोलीस ठाण्याचे सुहास वामनराव चव्हाण यांची सशस्त्र पोलीस कोष.

व्ही. बी नगर पोलीस ठाण्याचे पोपट निवृत्ती आव्हाड यांची दक्षिण नियंत्रण कक्ष, मेघवाडी पोलीस ठाण्याचे सुधाकर सुधाकर रामचंद्र हुबे यांची गोराई विभाग,विक्रोळी पोलीस ठाण्याचे सूर्यकांत शिवराम नाईकवाडी यांची संरक्षण व सुरक्षा, व्ही. पी रोड पोलीस ठाण्याचे भारत आप्पाजी पाटील यांची वाहतूक.

सागरी एक पोलीस ठाण्याचे सुरेश पांडुरंग मदने यांची गुन्हे शाखा, वाहतूक विभागाचे सोमेश्‍वर तुकाराम खाटपे व रमेश सदाशिव ढसाळ, रमेश यशवंत खिलारे यांची अनुक्रमे विशेष शाखा एक, उत्तर नियंत्रण कक्ष व विधानसभा सुरक्षा, विशेष शाखा एक व दोनचे राजेंद्र विश्‍वनाथ राणे, मोहिनी मनिष मोहाडीकर.

प्रशांत विनायक सावंत, संध्या बुधाजी गावडे यांची अनुक्रमे मेघवाडी, मंत्रालय सुरक्षा, विशेष शाखा एक, सशस्त्र पोलीस कोष, भोईवाडा पोलीस ठाण्याचे दत्तात्रय विष्णू ठाकूर यांची सशस्त्र पोलीस कोष, सायन विभागाचे सुहास पांडुरंग कांबळे यांची सशस्त्र पोलीस नायगाव, रायगडच्या जिल्हा जात पडताळणी समितीचे संजय रामचंद्र मोहिते यांची सायन विभाग, पूर्व नियंत्रण कक्षाचे अशोक संपतराव थुबे यांची सशस्त्र पोलीस कोष, पश्‍चिम नियंत्रण कक्षाचे शबाना इर्शाद शेख यांची सशस्त्र पोलीस कोष विभागात बदली करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT