सर्वाधिक श्रीमंत बिझनेस फॅमिली  Pudhari File Photo
मुंबई

Richest Business Families | देशातील 300 उद्योगपती रोज कमावताहेत 7100 कोटी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई; वृत्तसंस्था : बर्कलेज प्रायव्हेट क्लायंटस्-हुरून इंडियाच्या 2025 च्या ‘मोस्ट व्हॅल्युएबल कौटुंबिक व्यवसाय’ यादीत अंबानी कुटुंबाने सलग दुसर्‍या वर्षीही आघाडी कायम राखली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही अंबानी कुटुंबाची प्रमुख कंपनी 28.2 लाख कोटी रुपयांच्या मूल्यासह देशाच्या जीडीपीच्या 12 व्या भागाइतके योगदान देते.

300 कुटुंबांचा नवा टप्पा; दररोज 7100 कोटींची संपत्ती

बर्कलेज-हुरून यादीच्या दुसर्‍या आवृत्तीत या वर्षी 100 नव्या उद्योगपतींचा समावेश होऊन एकूण 300 बिझनेस फॅमिली झाली आहेत. या सर्व कुटुंबांच्या कंपन्या मिळून तब्बल 134 लाख कोटी रुपयांचे मूल्य साध्य करत असून हे टर्की आणि फिनलँड या दोन देशांच्या संयुक्त जीडीपीपेक्षा जास्त आहे.

15 टक्के

या कुटुंबांच्या व्यवसायांनी एकत्रितपणे गेल्या वर्षी दररोज 7,100 कोटी रुपयांची संपत्ती तयार केली असून, दोन दशलक्षांहून अधिक भारतीयांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या कंपन्यांनी एकूण कॉर्पोरेट टॅक्सच्या 15 टक्क इतका मोठा वाटा सरकारला दिला आहे.

मुंबई अग्रगण्य केंद्र

उद्योगनिहाय कलांबाबत औद्योगिक उत्पादनांनी प्रतिनिधित्वात आघाडी घेतली (48 कंपन्या), तर ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंटस्चे सरासरी मूल्यांकन सर्वाधिक होते. मुंबई 91 कंपन्यांसह अग्रगण्य केंद्र राहिले, त्यानंतर एनसीआर (62) आणि कोलकाता (25) या शहरांचा क्रमांक लागतो.

टॉप-3 कुटुंबे

अंबानी कुटुंब : 28.2 लाख कोटी रुपये

कुमार मंगलम बिर्ला कुटुंब : 6.5 लाख कोटी रुपये (दुसरे स्थान)

जिंदाल कुटुंब : 5.7 लाख कोटी रुपये (तिसरे स्थान)

10 कुटुंबे

अव्वल 10 कुटुंबे आता यादीच्या एकूण मूल्याच्या जवळपास निम्मे नियंत्रित करतात, जे देशाच्या औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात भारताच्या प्रमुख घराण्यांचा टिकून राहिलेला प्रभाव अधोरेखित करते.

85,800 कोटी

अहवालात व्यावसायिक प्रशासनातील वाढीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामध्ये 62 कंपन्या बिगर-कौटुंबिक सीईओंद्वारे चालवल्या जात आहेत, तसेच 22 कौटुंबिक व्यवसायांचे नेतृत्व महिलांकडे आहे, ही वाढती विविधता दर्शवते. विशेष म्हणजे, 85,800 कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह हलदीराम भारतातील सर्वाधिक मूल्यवान असूचीबद्ध कंपनी राहिली आहे.

पहिल्या पिढीचे उद्योजक चमकले

या वेगळ्या वर्गात अदानी कुटुंब 14 लाख कोटी रुपयांच्या मूल्यासह अग्रस्थानी तर पुनावाला कुटुंब 2.28 लाख कोटी रुपयांसह दुसर्‍या स्थानावर आहे. दिवी लॅबोरेटरजीची संपत्ती 1.81 लाख कोटींवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT