मुंबई

मुंबईत २७ किलो ड्रग्स जप्त; एकास अटक

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबईतील कस्टम विभागाने धडक कारवाई करत २७ किलोंचे ड्रग्स जप्त केले. या घटनेत मास्टरमाईड असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

अमेरिकेतून मुंबईत कुरिअरमधून ड्रग्सची तस्करी होत असल्याचा माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबईतील कस्टम अधिकाऱ्यांनी सापळा रचत एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यावेळी आरोपीच्या घरातून २७ किलो वजनाचे ड्रग्स जप्त केले. कस्टमची आतापर्यतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

या घटनेचा पुढील तपास कस्टम पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे मुंबईतील अंमली पदार्थांसंदर्भात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. यातील आरोपीच्या नावाची अद्याप माहिती मिळालेली नाही.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT