मुंबई

मुंबई : सौरऊर्जा प्रकल्पामध्ये 2500 कोटींची गुंतवणूक

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट यांची मुंबईत नुकतीच भागीदार बैठक झाली. यामध्ये महाराष्ट्रात आगामी काळात 500 मेगावॅट सौर प्रकल्पांवर लक्ष्य केंद्रित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. पहिल्या टप्प्यात सांगली, नाशिक, इचलकरंजी आणि कोल्हापूर या जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील यशानंतर हा उपक्रम उर्वरित महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल, असे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले.

या बैठकीदरम्यान महाप्रित आणि जीईएपीपीने पीएम-कुसुम सी /मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी 500 मेगावॅटच्या निविदेच्या अंमलबजावणीसाठी आराखडा तयार केला आहे. ज्यामुळे महाराष्ट्राला सौरऊर्जेमध्ये 2500 कोटींची गुंतवणूक येऊन एक लाख शेतकर्‍यांना थेट फायदा होणार आहे.

ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेटव्दारे प्रकल्प व्यवस्थापन युनिटची नियुक्ती करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT