250 शौचालयांची व्यवस्था 
मुंबई

Maratha Andolan| 250 शौचालयांची व्यवस्था

पिण्याच्या पाण्यासाठी दहा टँकरची व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

वाशी : मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत मोठ्या संख्येने आंदोलक सिडको एक्झिबिशन सेंटर व एपीएमसी मार्केट परिसरात मुक्कामी आहेत. सुविधा मिळत नसल्याची ओरड झाल्याने नवी मुंबई महापालिकेने सुविधांत वाढ केली आहे. पिण्याच्या पाण्यासह, शौचालये व स्वच्छतेसाठी कर्मचार्‍यांची व्यवस्था केली आहे. आरोग्य सुविधाही देण्यात येत आहेत.

अंघोळीसाठी 150 नळांची सुविधा

एक्झिबिशन सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दहा टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय आणखी पाच टँकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. अंघोळीसाठी एक्झिबिशन सेंटरमधील आतल्या आवारात 50 नळ व बाहेरील महाराष्ट्र सदनच्या भूखंडाजवळ 70 नळ अशाप्रकारे एकूण 150 नळांची सुविधा दिली आहे. कांदा-बटाटा मार्केट येथे 4 टँकर पुरवण्यात येत आहेत.

साफसफाईसाठी 30 जणांची टीम

सिडको एक्झिबिशन सेंटर येथे एकूण 250 शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. साफसफाईसाठी 30 जणांची टीम तसेच 5 सक्शन मशीन तैनात आहेत.कचरा वाहतुकीकरिता एकूण 6 वाहने सेवेत आहेत. कांदा -बटाटा मार्केट येथे स्वच्छता व साफसफाई करीता 10 कर्मचारी व कचरा वाहतुकीकरिता एकूण 2 वाहने ठेवण्यात आली आहेत.

वैद्यकीय सेवा

सिडको एक्झिबिशन सेंटर येथे 2 रुग्णवाहिका तसेच पुरेशी औषधे, डॉक्टर व इतर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाशी टोल नाका, कांदा- बटाटा मार्केट येथे प्रत्येकी 1 रुग्णवाहिका, औषधे, डॉक्टर, इतर कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 20 बेड राखीव ठेवण्यात आलेले आहेत. आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT