BMC News  
मुंबई

Mayor orders action against bangladeshis | २३७ बांगलादेशीयांना बोगस जन्म प्रमाणपत्र

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे महापौरांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीमध्ये म्हणजे गेल्या चार वर्षात तब्बल २३७ बोगस जन्म प्रमाणपत्र बांगलादेशीय नागरिकांना देण्यात आली. त्यामुळे या गंभीर घटनेची दखल घेत दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी (दि.१३ फेब्रुवारी) दिले. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबईतील बांगलादेशी नागरिकांच्या कोरीवरून महापौर विद्युत तावडे आक्रमक झाले आहेत. महापौरपदी नियुक्ती होत असताना बांगलादेशी नागरिकांना मुंबईतून हद्दपार करण्याची शपथ घेतली. शुक्रवारी तातडीने बांगलादेशी नागरिकांच्या मुलांना देण्यात आलेल्या जन्म प्रमाणपत्र बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, माहिती जाणून घेतली.

यावेळी सर्व उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महापालिका अतिरिक्त आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बांगलादेशी नागरिकांना २३७ बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले. त्यामुळे महापौर्णि मा या संपूर्ण घटनेची चौकशी करून, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे महापालिका प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT