बाबा सिद्दिकी  file photo
मुंबई

Baba Siddique | बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणारे २ आरोपी ताब्यात, एकजण फरार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवार गटाचे वांद्रे येथील नेते माजी र‍ाज्यमंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची शनिवारी (दि. १३) गोळ्या झाडून हत्या झाली. गोळीबार करणारे दोन संशयीत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे. करनेल सिंग (हरियाणा) आणि धर्मराज कश्यप (उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, सिद्दिकी सलमान खानचे निकटवर्तीय असल्याने पोलिसांनी बिश्नोई गॅंग तसेच वांद्रे परिसरातील ज्ञानेश्वर नगर एसआरए प्रकल्प या दोन्ही अँगलने तपास सुरू केला आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत. या कामासाठी आरोपींना आगाऊ पैसे दिले जात होते. त्यांना काही दिवसांपूर्वी शस्त्र मिळाली होती. गेल्या ८ तासांपासून मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून आरोपींची चौकशी सुरू आहे.

गोळीबारात वापरलेली पिस्तूल पोलिसांनी जप्त केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर ३ ते ४ राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. निवडणुकीपूर्वीच त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांना जीवे धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहेत बाबा सिद्दिकी?

  • तरुणपणी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या बाबा सिद्दिकी यांनी फेब्रुवारीमध्ये 48 वर्षांनी पक्ष सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

  • "काँग्रेसमध्ये माझी स्थिती अशी होती की, जेवणाची चव वाढवण्यासाठी कढीपत्ता कसा वापरला जातो. तसे मला काँग्रेस पक्षात अशीच वागणूक दिली गेली," असे त्यांनी पक्षातील अन्यायाबद्दल सांगितले.

  • बाबा सिद्दीकींचा मुलगा झीशान हा मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील काँग्रेसचा आमदार आहे. ऑगस्टमध्ये पक्षविरोधी कारवायांसाठी झिशानची हकालपट्टी करण्यात आली होती.

  • बाबा सिद्दिकी हे त्यांच्या भव्य इफ्तार पार्ट्यांसाठी ओळखले जात होते. शाहरुख खान, सलमान खान सारखे मोठे स्टार उपस्थित असायचे. (Baba Siddique)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT