Pilgrimage Site Development | बाहुबली, कुंथुगिरी तीर्थक्षेत्र विकासासाठी १८ कोटी मंजूर 
मुंबई

Pilgrimage Site Development | बाहुबली, कुंथुगिरी तीर्थक्षेत्र विकासासाठी १८ कोटी मंजूर

मुख्‍यमंत्री फडणवीस यांची आराखड्यास प्रशासकीय मान्‍यता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र बाहुबली आणि श्रीक्षेत्र कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकास आराखड्यातील १८ कोटी २० लाख ६४ हजार रुपयांच्या प्रस्तावित कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत बुधवारी (दि. १८) प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह नगरविकास राज्यमंत्री तथा कोल्हापूरच्या सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अशोकराव माने, प्रकाश आवाडे, मुख्य सचिव, नियोजन विभाग तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्यासह ‘जवाहर’चे उपाध्यक्ष बाबासोा चौगुले, डी. सी. पाटील, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. तर, आ. राहुल आवाडे, पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगवे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी जॅसमिन व्‍हीसीद्वारे उपस्थित होते.

बाहुबली परिसरात रस्‍ता, अंतर्गत रस्‍त्‍यांवर सौरदिवे

कुंभोज येथील श्रीक्षेत्र बाहुबलीच्या विकासासाठी ९ कोटी रुपयांच्या आराखड्यातील कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये तीर्थक्षेत्र परिसरात रस्ता, शाळेच्या प्रांगणात काँक्रिटीकरण, भाविकांकरिता बाकड्यांची व्यवस्था, प्रशासकीय कार्यालयासमोर पेव्हिंग ब्लॉक, अंतर्गत रस्त्यांच्या बाजूने सौरदिवे आदी कामांचा समावेश आहे.

तीन हजार क्षमतेचे सत्‍संग भवन, पार्किंग बांधकाम

आळते येथील श्रीक्षेत्र कुंथुगिरी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ९ कोटी २० लाख ६४ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पेव्हिंग ब्लॉक, अंतर्गत रस्त्यांचे आणि वाहनतळाचे काँक्रिटीकरण, संरक्षक भिंतीचे उर्वरित बांधकाम; याशिवाय तीन हजार व्यक्तींची क्षमता असलेली आरसीसी सत्संग भवन इमारत उभारण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT