मुंबई : अकरावीची पहिली यादी शनिवारी जाहीर झाली असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना सोमवारपासून ते 7 जुलैपर्यंत प्रवेश घ्यावे लागणार आहेत. याबरोबरच विद्यार्थ्यांना आपल्या लॉगिन मधून झीेलशशव षेी -वाळीीळेप यावर क्लिक करून प्रत्यक्ष प्रवेशासाठी जावे लागणार आहे.
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत मुंबई विभागातील अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत एकूण 1 लाख 39 हजार 943 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यात 64 हजार 887, पालघरमध्ये 15 हजार 093 तर रायगडमध्ये 13 हजार 837 विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश मिळाले आहेत. सर्वाधिक प्रवेश हे वाणिज्य शाखेत 69 हजार 107 विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. विज्ञान शाखेचे 54,234 आणि कला शाखेचे 16,602 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. मुंबईत 4 लाख 67 हजार 720 जागा आहेत. त्यापैकी या फेरीत 1 लाख 39 हजार 943 विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाले आहेत.
दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे राबवली जात असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली जात होती.
राज्यातून पहिल्या प्रवेश फेरीसाठी 10 लाख 66 हजार पाच विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यात कला शाखेच्या दोन लाख 31 हजार 356 विद्यार्थ्यांनी तर वाणिज्य शाखेच्या दोन लाख 24 हजार 931 विद्यार्थ्यांनी आणि विज्ञान शाखेच्या सहा लाख नऊ हजार 718 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या 10 लाख 66 हजार पाच विद्यार्थ्यांपैकी सहा लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंती क्रमांकानुसार पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित केले आहेत.
विद्यार्थ्यांस पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले असल्यास त्या विद्यार्थ्याला सोमवारपासून प्रवेश घ्यावा लागणार आहे. जर प्रवेश न घेतल्यास पुढील एका फेरीसाठी बाद व्हावे लागणार आहे. जर विद्यार्थ्यास त्यांच्या पसंतीक्रमाच्या 2 ते 10 क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले असेल आणि त्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांस प्रवेश हवा असेल तर, प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील फेरीच्या सूचना प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जातील त्याप्रमाणे कार्यवाही करावी. आपल्याला असलेले गुण आणि मिळालेले महाविद्यालय याचाही ताळमेळ घेत प्रवेशाचा अंतिम निर्णय घ्यावा, असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.
मुंबई शहर/उपनगर 64,887
पालघर 15,093
रायगड 13,837
ठाणे 46,126
एकूण 1,39,943
यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने पहिल्यांदाच या जागांची कट-ऑफही संकेतस्थळावर जाहीर केली असून ही कट-ऑफ सर्वसाधारण श्रेणीतील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या गुणांपेक्षा किमान दोन आणि कमाल 20 गुणांनी जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईतील जवळपास सर्वच महाविद्यालयांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील मुलांपेक्षा मुलींच्या कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी चढाओढ आहे. विद्यार्थिनींनी मिळवलेले गुण हे विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त असल्याचेही आकडेवारीवरून दिसून आले होते. आता मुलींसाठी आरक्षित असलेल्या 30 टक्के जागांमधून प्रवेश घेण्याचा मार्ग मुलींनी निवडला, तर तिथे असलेल्या वरचढ कट-ऑफला तोंड द्यावे लागणार आहे.