Mondoon strike in kerala
पुणे: मान्सूनने रविवारी अरबी समुद्रात प्रगती केली असून, 27 मेपर्यंत केरळात दाखल होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, राज्यातील 14 ठिकाणी 19 ते 22 मेदरम्यान अतिवृष्टीचा (ऑरेंज अलर्ट) तर संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा (यलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. गत 24 तासांत राज्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
मान्सून वेगाने प्रगती करीत असून रविवारी त्याने अरबी समुद्रात आणखी प्रगती केली. त्यामुळे तो केरळ राज्यात 27 मेपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून, रविवारी बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. गत 24 तासांत राज्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. (Pune news Update)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सोलापूर, धाराशिव.
मुंबई, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ.
आकडे मिमीमध्ये /1 ते 18 मेपर्यंत
धाराशिव (48.5), महाबळेश्वर (118.2), अहिल्यानगर (21.4), सातारा (47.4), सांगली (111.8),सोलापूर (62.1), कोल्हापूर (72.4), नाशिक (103.3), नांदेड (65.6), पुणे (60.7), बीड (34.2), बारामती (7.4), परभणी (31.2), उदगीर (55), माथेरान (138.8)