मराठवाडा

सुभाष साबणेंचा व्हिडिओ एकनाथ शिंदेंनी केला ट्विट

मोहन कारंडे

देगलूर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी 27 जून रोजी एका व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुखांवर हल्ला चढवत राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केल्यावरून जहरी टीका केली.

एकनाथ शिंदे व सर्व बंडखोर आमदारांचे समर्थन केले आहे, तोच व्हिडिओ एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटरवरून प्रसारित करत ट्विट केल्याने सुभाष साबणेंच्या त्या व्हिडिओची राज्यभरात प्रचंड चर्चा होत आहे. शिंदे यांच्यावर मंत्री आदित्य ठाकरे आणि खा.संजय राऊत अक्षरशः आग ओकत असताना स्वतः एकनाथ शिंदे मात्र एकापाठोपाठ एक ट्विट करून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये नवे नवे ट्विस्ट आणत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा माजी आमदार सुभाष साबणेचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणार्‍या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना, आपल्याला काहीच यातना होत नाहीत का? असा सवाल माजी आमदार सुभाष साबणे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित होता.

SCROLL FOR NEXT