औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : तेरा वर्षीय मुलीच्या घरात घुसून 22 वर्षीय नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत 20 जून रोजी हा संतापजनक प्रकार घडला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला 25 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
लखन भिक्कन नरवडे (22) असे अत्याचार करणार्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, आरोपी नरवडे आणि पीडितेचे कुटुंबीय एकाच भागात राहतात. नरवडे हा तिथे किरायाने राहतो. पीडितेचे आई-वडील घरी नसल्याची संधी साधत तो घरात घुसला. त्याने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला.
या प्रकरणी मुलीने कुटुंबीयांच्या मदतीने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्याने नरवडे विरोधात कलम 376 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी आरोपी नरवडेला बेड्या ठोकल्या आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने नरवडेला 25 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांनी दिली