मराठवाडा

लातूर : दुचाकी अपघातात अभियंत्याचा मृत्यू 

दिनेश चोरगे

अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लांजी पाटीजवळ मोटारसायकलच्या विचित्र अपघातात एक तरुण इंजिनिअर जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना 20 ऑगस्ट रोजी घडली. तालुक्यातील गोताळा येथील रहिवाशी पण सध्या अहमदपूर शहरात वास्तव्यास असलेले अजय नरसिंग पाटील (वय 28) हे उजना येथे सिद्धी शुगर्स अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या ठिकाणी केन अभियंता म्हणून कार्यरत होते.

श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार असल्याने आपली दुचाकीने (एम.एच- 12- क्यू. एच.0392) ते सायंकाळी सहा वाजता तालुक्यातील परचंडा येथे गावी गेले. देवदर्शन आटोपून परत आपल्या घराकडे निघाले असता सात वाजेच्या सुमारास लांजी पाटीजवळ त्यांच्या गाडीच्या टाकीला काळविटाने जोरात धक्का दिला.त्यानंतर दुचाकी घसरून त्यात ते खाली पडले. दरम्यान पाठीमागून येणार्‍या अज्ञात वाहनाने काळवीट व अजय देशमुख यांना फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT