मराठवाडा

बीडच्या दुचाकी चोरास लातुरात अटक, १२ मोटारसायकली जप्त

निलेश पोतदार

लातूर; पुढारी वृतसेवा चार वेगवेगळ्या शहरांतील मोटारसायकली पळवणाऱ्या एका व्यक्‍तीस येथील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १२ मोटारसायकलींसह 4 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकाश नागुराव मोरे (वय 33 वर्ष) असे त्याचे नाव असून, तो बीड जिल्ह्यातील भालगाव येथील रहिवाशी आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोटारसायकल चोरीचा तपास करण्यासाठी पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या निर्देशानुसार पथके गठीत करण्यात आली आहेत. दरम्यान गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक 20 फेब्रुवारी रोजी सिद्धेश्वर यात्रेत पाई पेट्रोलिंग करीत होते. यावेळी एक व्यक्ती मोटारसायकल ढकलत जात असताना त्यांना दिसला. संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याजवळील मोटारसायकलबद्दल माहिती विचारली असता, तो उडवा उडवीची उत्तर देऊ लागला. शेवटी पोलिसी हिसक्यापुढे तो सरळ झाला. त्याने ती मोटारसायकल लातूर बस्थानकातून चोरल्याचे सांगितले.

कोल्हापूर, पुणे, अंबाजोगाई, लातूर येथे चोरी केलेल्या ४ लाख ३५ हजार रुपयांच्या मोटारसायकली त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोटे यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वात दामोदर मुळे, रणवीर देशमुख, रणजित शिंदे, दत्ता शिंदे, भाऊसाहेब मंथलवाड, सुदर्शन पाटील, शिवाजी पाटील, शिवराज अनंतवाड. ढगे, पारडे, सोनटक्के यांनी पार पाडली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT