मराठवाडा

बीड : पोलिस ठाण्यातून पळालेला गुटखामाफिया पकडला

अनुराधा कोरवी

बीड, पुढारी वृत्तसेवा ः विशेष पथकाने कारवाई करत ताब्यात घेतलेल्या दोन गुटखामाफि या पेठबीड पोलिसांच्या ताब्यातून शनिवारी सायंकाळी पळून गेले होते. यानंतर पोलिसांनी गतीने तपास करत यातील एकाला सोमवारी दुपारी पुन्हा पकडले, तर दुसर्‍याचा शोध सुरू आहे.

शहरातील बार्शी रोड भागात पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुटखा वाहतूक करणार्‍या पीकअपसह गुटखा पकडला होता. यावेळी शेख मोहसीन शेख सलाउद्दीन (28,रा.खाजानगर, मोमीनपुरा, बीड) व शेख इकबाल शेख रशीद (रा. मिल्लतनगर, मोमीनपुरा, बीड) यांना ताब्यात घेऊन पेठबीड पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तेथे या दोन्ही आरोपींनी मळमळ होत असल्याचे कारण सांगत ठाणे अंमलदार राठोड यांच्यासह बाहेर आले. तेथून त्यांच्या हाताला झटका देऊन दोघेही पळून गेले. राठोड यांनी त्यांचा पाठलाग केला परंतु एका दुचाकीवरून ते दोघे फरार झाले.

या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर पेठबीड पोलिसांनी गतीने तपास करत सोमवारी दुपारी इकबाल शेख याला अटक केली आहे. मोहसीन शेख याचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक केदारनाथ पालवे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT