मराठवाडा

बीड : परळी औष्णिक केंद्राजवळ स्फोटकांसह तिघांना पकडले; जिलेटीन जप्त

मोहन कारंडे

परळी, पुढारी वृत्तसेवा : परळी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राबाहेर पडणार्‍या राखेच्या ठिकाणी स्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली.

त्यांच्याकडून जिलेटिनच्या 103 कांड्या, 150 तोटे, बॅटरी, वायर असे साहित्य जप्त करण्यात आले. या तिघांनी राखेसाठी हा खटाटोप करण्याचा प्रयत्न केला होता, असे पोलिसांनी सांगितले. मारोती काचगुंडे, हरिश् चंद्र तुकाराम जाधव, बालाजी लालू चव्हाण अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. या केंद्रास दहशतवादी व इतर व्यक्तींपासून धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते. शुक्रवारी सायंकाळी केंद्रातून बाहेर पडणार्‍या राखेच्या ठिकाणी स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT