मराठवाडा

बीड : दोन लाख रुपयांसाठी विवाहितेला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

मोहन कारंडे

केज, पुढारी वृत्तसेवा : माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना बानेगाव येथे घडली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून तिचा नवरा आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मदीना कलीम पठाण (वय 30 रा. बानेगाव ता. केज) या विवाहीतेने केज पोलिस ठाण्यात पती आणि सासूविरुद्ध तक्रार दिली आहे. दहा वर्षा पुर्वी तिचे लग्न बानेगाव येथील कलीम रसुल पठाण याच्याशी मुस्लीम रितीरीवाजाप्रमाणे झाले. तिचा पती कलीम पठाण मजुरी करून कुटुंबाची उपजीवीका भागवतात. लग्ना नंतर तिला सात वर्षे चांगली गेली. यानंतर तिचा नवरा कलीम पठाण याला दारु पिण्याचे व्यसन लागले. दारुच्या व्यसनामुळे त्याच्यावर कर्ज झाले. ते कर्ज फेडण्यासाठी व घर बांधण्यासाठी आई-वडीलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत कलीम पठाण पत्नी मदीनाला मारहान करू लागला. दरम्यान, गुरूवारी (दि.23) सायंकाळी कलीम पठाण याने मदिना हिला तू तुझ्या नातेवाईकांना का बोलवले? म्हणत शिवीगाळ केली. यावेळी मारहान करत घरातील रॉकेल मदिनाच्या अंगावर टाकुन तीला पेटवून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मदिना पठाण हीच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

SCROLL FOR NEXT