मराठवाडा

परभणी : सात फुटांचा आढळला धामण साप

मोनिका क्षीरसागर

परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील एमायडीसी परिसरात धामण जातीचा सात फूट लांब असलेला साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती सर्पमित्रांना दिल्यानंतर त्यांनी त्या सापास पकडले. परभणी शहरातील एमआयडीसी परिसरात अग्रवाल इंडस्ट्रीज लगत धामण जातीचा साप कामगारांच्या निदर्शनास आला होता.

हा साप तब्बल सात फूट लांबीचा असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या कामगारांनी तत्काळ या सापाबाबत शिवसेनेचे शाखाप्रमुख विशाल कळसाईतकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. कळसाईतकर यांनी सर्पमित्र रामेश्‍वर कळसाईतकर यांना फोनवरून सापाबाबत कळविल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्या सापाला पकडले. सर्पमित्र रामेश्‍वर कळसाईतकर यांनी हा साप धामण जातीचा असून, तो बिनविषारी असल्याचे सांगितले.

साप हा शत्रू नसून पर्यावरणाचा मित्र असल्याचेही यावेळी बोलताना सांगितले. सध्या पावसाळा सुरू असल्याने उष्णतेमुळे व बेडूक, उंदीर खाण्याच्या शोधात साप बाहेर निघत असतात. त्यामुळे कुठे साप आढळून आल्यास त्यांना दुखापत न करता सर्पमित्रांशी तत्काळ संपर्क साधून माहिती द्यावी व पर्यावरणाचे रक्षण करावे असेही त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT