मराठवाडा

नॅनो युरिया, डीएपीमुळे खतावरील खर्च होणार कमी

दिनेश चोरगे

बीड; उदय नागरगोजे : एकीकडे खताच्या किंमती दरवर्षी वाढत असताना सर्वाधिक मागणी असलेल्या युरिया आणि डीएपीचे नॅनो – टेक्नॉलॉजीद्वारे निर्माण केलेले द्रवरूप खत बाजारात उपलब्ध होत आहे. यातील युरिया सध्या उपलब्ध आहे, तर डीएपी अवघ्या दोन महिन्यांत बाजारपेठेत येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खतावरील खर्च कमी होण्याबरोबरच पाणी व हवेचे प्रदूषण टाळले जाणार आहे. याच्या जोडीला जमिनीचा पोत सुधारणार आहे.

गत काही काळापासून पीक उत्पादनासाठी लागणारा खर्च वाढत चालला आहे. तर दुसरीकडे उत्पादित मालाच्या विक्रीला शाश्वत दर नसल्याने शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. शेती उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या खताच्या किंमत गत काही वर्षात सातत्याने वाढत आहेत. रासायनिक खत हे गरजेपेक्षा अधिक वापरले गेल्याने खर्च तर वाढतोच त्याबरोबरच पाणी व हवेचे देखील प्रदूषण होते. अधिकच्या खत वापराने जमीन नापिक झाल्याचेही आपण अनेक ठिकाणी पाहिले असेल. या सर्वावर एक क्रांतिकारी पर्याय उपलब्ध होत आहे.

यातील युरिया बाजारपेठेत सध्या उपलब्ध असून एका ४५ किलोच्या गोणीऐवजी केवळ पाचशे एमएल बॉटल पुरेशी ठरणार आहे. या बॉटलमधील नॅनो युरिया थेट पिकाच्या पानावर फवारला गेल्याने जमिनीचे प्रदूषण टळण्याबरोबरच खताचा अपव्ययही होणार नाही. पर्यायाने त्यावरचा खर्चही कमी होणार आहे. अशाच पद्धतीने नॅनो डीएपीलाही उच्चस्- तरीय तज्ञांच्या समितीने हिरवा कंदील दाखवला असून एप्रिल महिन्यात हा डीएपी बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. यावर शेतकऱ्यांचा होणारा खर्च निम्म्याने कमी होणार आहे. याबरोबरच वाहतूक व साठवणुकीचा खर्च व त्रासही कमी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT