मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर : आमसरी गावात पिसाळलेल्‍या कुत्र्याचा चार जणांना चावा

निलेश पोतदार

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा आमसरी ता. सिल्लोड येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. आज (मंगळवार) सकाळी चार जणांना या पिसाळलेल्‍या कुत्र्याने चावा घेतला. जखमींवर अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमसरी गावात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, यात पिसाळलेल्या कुत्र्यामुळे रस्त्याने फिरणेही धोकादायक बनले आहे.

मंगवारी गावात पिसाळलेल्या लालबांडा रंगाच्या कुत्र्यांने चावा घेतल्याने चारजण जखमी होण्याचा प्रकार घडला. यात आमसरी येथील १) रामू रानोबा साबळे (वय ४२ वर्ष) २ ) लक्ष्मीबाई बळीराम साबळे (वय ६८ वर्षे), ३) रामदास लक्कस (वय ३० व वर्षे) ४) छायाबाई रमेश मोरे (वय ३९ वर्षे) हे जखमी झाले. यांना पिसाळलेल्या कुत्र्याने घराच्या आवारात चावा घेतल्याने या पिसाळलेल्या कुत्र्याची भीती वाढली आहे.

आमसरी परीसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने भटक्या कुत्र्यांना चावा घेतल्यास पिसाळलेल्या कुत्र्याची संख्या वाढून धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे तातडीने भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT