मराठवाडा

कोल्हापुरात IIB – FAST  परीक्षेला  विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

दिनेश चोरगे

लातूर :  देशभरात सर्वाधिक डॉक्टर घडविणारी इन्स्टिट्यूट म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटने नांदेड, लातूर आणि पुणे नंतर आता कोल्हापूर नगरीत आपली भावी डॉक्टर घडविण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू केलेली आहे.

रविवार, दि. 15 जानेवारी रोजी आयआयबीच्या कोल्हापूर शाखेत इयत्ता 11 वी तून 12 वीमध्ये प्रवेशासाठी पार पडलेल्या खखइ-ऋअडढ परीक्षेला कोल्हापूरबरोबरच शेजारील सातारा, सांगली जिल्ह्यासह कोकण विभागातील जिल्ह्यातील डॉक्टर-इंजिनिअर होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आयआयबी इन्स्टिट्यूटवरील विश्वास असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.

मागील तब्बल 23 वर्षांपासून देशात सर्वाधिक डॉक्टर, इंजिनिअर घडविणारी संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटचा देशभरात नावलौकिक आहे. नांदेड, लातूर आणि पुणे येथे नीट आणि जेईईच्या तयारीसाठी आयआयबी इन्स्टिट्यूटच्या शाखा आहेत. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली याशिवाय कोकण विभागातील जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना लातूर, नांदेड, पुणे येथे येण्यासाठी वैयक्तिक अडचणी निर्माण होतात या जाणिवेने विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधेसाठी काही दिवसांपूर्वीच आयआयबी इन्स्टिट्यूटच्या वतीने कोल्हापूर येथे शाखा स्थापन करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

आयआयबी इन्स्टिट्यूटने आपला शाखा विस्तार करत कोल्हापूर येथे शाहूपुरी गल्ली नं. 3 येथे नवीन शाखा स्थापन केली आहे. कोल्हापूर येथे शाखा स्थापन झाल्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली याशिवाय कोकण विभागातील जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या आणि डॉक्टर-इंजिनिअर होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. याशिवाय नीट, जेईईच्या तयारीसाठीचा जो लातूर-नांदेड पॅटर्न आहे त्याच धर्तीवर कोल्हापूर पॅटर्न निर्माण करणार असल्याची ग्वाही यावेळी आयआयबी इन्स्टिट्यूटने दिलेल्या शब्दाप्रमाणे कोल्हापूरही आगामी काळात एक पॅटर्न म्हणून उदयास येईल हे नक्की. दरम्यान, रविवार, दि. 15 जानेवारी रोजी आयआयबीच्या कोल्हापूर शाखेत 11 वीतून 12 वीमध्ये प्रवेशासाठी पार पडलेल्या खखइ-ऋअडढ परीक्षेला हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान, आयआयबी इन्स्टिट्यूटची शाखा कोल्हापूरात स्थापन झाल्यामुळे पालक – विद्यार्थ्यांतून आयआयबीच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

आयआयबी इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागातील विद्यार्थ्यांची असते; मात्र आयआयबीच्या नांदेड, लातूर या शाखा विद्यार्थ्यांना खूप दूर पडतात. याशिवाय दोन्ही ठिकाणाच्या वातावरणात/परिस्थिती बदल असल्याने विद्यार्थ्यांना केवळ आर्थिकच नव्हे तर आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. आता थेट कोल्हापूर येथेच आयआयबीची शाखा स्थापन झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागातील विद्यार्थ्यांना आपले घर, आपल्या आई-वडिलांच्या जवळ राहून आयआयबीमध्ये शिक्षण घेऊन आपल्या स्वप्नांना सत्यात उतरविता येणार आहे.

जे विद्यार्थी नीट, जेईईची तयारी करतात त्यांच्यासाठी वेळेचे महत्त्व अनन्यसाधारण असते. मात्र, अनेक कोचिंग क्लासेसमध्ये वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, आयआयबी इन्स्टिट्यूट ही आपल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण करून घेते. यासाठी परफेक्ट अशी अ‍ॅकॅडमीक प्लॅनिंग केली जाते आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येते. त्यामुळे आयआयबी इन्स्टिट्यूट ही आज विद्यार्थीप्रिय कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जाते. याशिवाय ज्या प्रमाणे उज्ज्वल निकाल आयआयबी देत असते त्याच उज्ज्वल निकालाचा पॅटर्न हा आगामी काळात कोल्हापूरमध्ये दिसून येईल.
प्रा. चिराग सेनमा, डायरेक्ट, आयआयबी इन्स्टिट्यूट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT