मराठवाडा

कृषी अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करा; शेतकरी आत्महत्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक

अनुराधा कोरवी

गेवराई, पुढारी वृत्तसेवा ः जळगाव माजरा येथील शेतकरी अंकुश बोबडे या शेतकर्‍याने कृषी विभागाकडील अनुदान न मिळाल्याने आत्महत्या केली. कृषी विभागात पोखरा योजनेच्या नावाखाली अक्षरशः लूट केली जात असून, या आत्महत्या प्रकरणात कृषी अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गेवराई तालुका काँग्रेसच्या वतीने महेश बेदरे यांनी केली आहे.

गेवराई तालुक्यातील कृषी विभागात मनमानी कारभार सुरु आहे. या ठिकाणी शेतकर्‍यांच्या नावाखाली अधिकारी स्वतःचेच कल्याण करत असल्याचा आरोप महेश बेदरे यांनी केला आहे. बोबडे यांचे पोखरा योजनेअंतर्गतचे अनुदान रखडले होते. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेतकर्‍यांना योजनांचा लाभ द्यायचा आणि अनुदान मात्र द्यायचे नाही हा प्रकार अडचणीत आणणारा असून या ढिसाळ कारभाराविरोधात काँग्रेस आंदोलन करणार असल्याचेही तालुकाध्यक्ष महेश बेदरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT