मराठवाडा

औरंगाबाद : बंडखोरांनी सत्ता उपभोगली…खबरदार, अजित पवारांवर आरोप कराल तर..!

मोहन कारंडे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या बंडखोर आमदार, मंत्र्यांनी अडीच वर्षे सत्ता उपभोगली, तेव्हा ते झोपले होते? निधी कमी पडत होता, तर बोलले का नाही? निधीवाटपावरून अजित पवार यांच्यावर होत असलेले आरोप बिनबुडाचे असून, आता आरोप कराल, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करून आरोपांचे उत्तर देईल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सत्ता उपभोगून शिवसेनेचे बंडखोर आता चोरांप्रमाणे लपून बसले असून, ते भाजपच्या ताटाखाली गेले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अजित पवार यांनी मतदारसंघात निधी दिला नाही, असे आरोप शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केला आहे, प्रत्यक्षात मात्र अजित पवार यांनी 11 हजार 935 कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे, यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केला आहे, निधी मिळाला असतानाही बंडखोर आमदार हे अजित पवार यांच्यावर आरोप करत आहेत, आता हे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. आता आरोप झाले, तर याचे रस्त्यावर उतरून उत्तर दिले जाईल असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाला मोठा निधी देणयात आला, डीपीसीमार्फत जिल्ह्याला निधी देण्यात येतो.

यातही जिल्ह्याला झुकते माप देण्यात आले आहे, पैठण येथील ब—ह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेला दोनशे कोटी, तर वॉटर ग्रीडसाठी साडेतीनशे कोटी रुपये देण्यात आले, जिल्ह्यात शासकीय कमिटीत राष्ट्रवादीला स्थान नसतानाही पक्ष दुजाभाव करत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला विकास पाटील दांडगे, अनुराग शिंदे, शिवाजी गावंडे, जयमलसिंग रंधावा, जयराम कुटे, अतुल गावंडे, सुधाकर कचकोरे, दिलीप खरात, सुखदेव पठाडे, कुंडलिक अप्पा अंभोरे, किरण पाखरे, काका बनसोडे आदींची उपस्थिती

SCROLL FOR NEXT