उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा: भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचार्याचा जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना आरळी खुर्द ते बसवंतवाडी रस्त्यावर घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की वनिता गाडे व राजू जेवणासाठी घराकडे पायी जात होते. यावेळी अज्ञात दुचाकीस्वाराने त्याच्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे चालवून राजू गाडे यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात राजू गाडे यांचा जखमी होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी मयताची पत्नी वनिता गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचलंत का?