उस्मानाबाद ः पुढारी वृत्तसेवाः समता नगरातील अक्षय संजय नायगावकर यांना मोबाईलवर आलेल्या संदेशातील अॅप डाऊनलोड करून घेतले. यानंतर अॅपमधील सूचनेप्रमाणे त्यांनी आपल्या क्रेडिट कार्ड क्रमांक, पासवर्ड व अन्य माहिती भरली. या माहितीआधारे समोरील भामट्याने त्यांच्या खात्यातून 2 लाख 12 हजार 803 रुपये ऑनलाईन खात्यात वळवले. या प्रकरणी अक्षय नायगावकर यांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.