नांदेड; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनीही त्यांचे स्वागत केले.
यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार प्रविण दरेकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भिमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. एस. एम. महावरकर, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, संजय कोडगे, यंकटराव गोजेगावकर, चैतन्यबापू देशमुख, संतुक हंबर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.