बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवसांपासून आलेली राहूल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा रविवारी सायंकाळी मध्यप्रदेश कडे मार्गस्थ होणार होती. परंतू गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेच्या नियोजित कार्यक्रमात ऐनवेळी थोडा बदल करण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील निमखेडी (ता.जळगाव जामोद) येथेच सोमवार व मंगळवारला यात्रा दोन दिवसांची विश्रांती घेणार आहे.राहूल गांधी हे सोमवारी हेलिकॉप्टरने गुजरात राज्यात प्रचारासाठी जातील व मंगळवारचा सायंकाळी परतल्यानंतर त्यांची भारत जोडतो यात्रा पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होईल.
सातपुड्याच्या कुशीतील आदिवासीबहूल नीमखेडी येथे हेलीपैड तयार करण्यात आले आहे.दरम्यान दोन दिवस भारत जोडतो यात्रेसमवेतचे वरिष्ठ नेते,भारत यात्री व अन्य सहकारी यांचा मुक्काम निमखेडी येथेच राहणार आहे.