मराठवाडा

तुळजापूर बाजार समिती निवडणूक निकाल : १८ पैकी भाजपला १४ तर मविआ ४ जागांवर विजयी

backup backup

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर कृषी बाजार समितीत झालेल्या निवडणुकीत भाजपने १८ पैकी १४ जागांवर विजय मिळवला आहे. आमदार जगजितसिंह पाटील गटाला बाजार समिती ताब्यात ठेवण्यात यश मिळाले.

शनिवारी (दि. 29) तुळजाभवानी अभियांत्रिकी स्पोर्ट्स क्लब हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी एम. आर. अंबीलपूरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरुवात झाली. सुरुवातीस हमाल मतदारसंघातील निकाल भाजपच्या बाजूने लागला, तर ग्रामपंचायत मतदार संघातील निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. सोसायटी मतदारसंघात क्रॉस वोटिंग झाल्यामुळे वेळ लागला, यामध्ये अखेर भाजपने बाजी मारली.

भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर बाजार समितीमध्ये सोसायटी गटामधून उभ्या केलेल्या अकरा जागेवर शंभर टक्के यश मिळाले आहे. व्यापारी गटामधून दोन जागा आणि हमाल मापाडी मधून एक जागेवर भाजपला विजय मिळाला आहे. तर ग्रामपंचायत मतदार संघात सर्व ४ पैकी ४ जागा महाविकास आघाडीने जिंकून भाजपला एक प्रकारचा धक्का दिला आहे. या निवडणुकीमध्ये आमदार राणा जगदीश पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुनील मधुकरराव चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

SCROLL FOR NEXT