मराठवाडा

जालना: धुळे-सोलापूर महामार्गावर ट्रक-दुचाकी धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी

अमृता चौगुले

वडीगोद्री(जालना), पुढारी वृत्तसेवा : धुळे- सोलापूर महामार्गावरील गहिनीनाथनगर येथे ट्रक – दुचाकीची धडक झाली. यामध्ये एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज ( दि. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, धुळे-सोलापूर महामार्गांवरून गहिनीनाथ नगर येथे कट पॉईंट वरून ट्रक (एमएच 16 ए एफ 8888) भरधाव वेगाने रस्ता ओलांडून सर्व्हिस रोडला जात होता. महाकाळा येथून पाथरवाला खुर्द येथे जात असताना दुचाकी (क्रमांक एम एच 21 बी टी 4185) धडक झाली. या धडकेत सोमनाथ बप्पासाहेब डोईफोडे (वय 40) हे जागीच ठार झाले. तर बबन विठ्ठल साबळे (वय 52) हे  गंभीर जखमी झाले. स्‍थानिकांनी जखमीला अंबड येथे रुग्णालयात दाखल करण्यात केले. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला.

SCROLL FOR NEXT