मराठवाडा

हिंगोली : भरधाव टेम्पोची टाटा मॅजिकला धडक; 2 ठार 6 जखमी

अमृता चौगुले

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जावळा बाजार ते औंढा नागनाथ मार्गावर बाराशिव कारखान्याजवळ भरधाव टेम्पो आणि टाटा मॅजिकचा अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री घडली. सोपान अण्णासाहेब कुरे (वय 45), किसन गंगाधर वाहुळे (वय 20, रा. दिग्रस कुरे जि. परभणी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर विष्णू विठ्ठल कुरे, ज्ञानोबा हरिभाऊ कुरे, सोपान नीलकंठ कुरे, मोतीराम बाळासाहेब कुरे, गोपाल नरहरी कुरे, लक्ष्मण संभाजी कदम अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील डिग्रस कुरे येथील 10 जण उसाचे वाढे घेऊन टाटा मॅजिक ऑटोने (एमएच- 13- एएन- 6584) औंढा नागनाथकडे येत होते. त्यांचे वाहन जवळा बाजार ते औंढा नागनाथ मार्गावर बाराशिव कारखान्याजवळ आले असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातामुळे टाटा मॅजिक ऑटो रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. या अपघातामध्ये ऑटो मधील उसाच्या वाढयावर बसलेले सोपान कुरे व किसन वाहूळे जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती हट्टा पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT