मराठवाडा

विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या प्रभारी मुख्याध्यापकाचे निलंबन

अमृता चौगुले

हिंगोली,पुढारी वृत्‍तसेवा : कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद शाळेत जादा तासिकाच्या नावाखाली विद्यार्थिनीशी अश्लील चाळे प्रभारी मुख्याध्यापक भगवान अवचार हे करत होते. या मुख्याध्यापक निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या निलंबनाचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंगळवारी रात्री दिले.

या मिळालेल्‍या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथे प्रभारी मुख्याध्यापक भगवान अवचार याने शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने एका विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केले. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी त्यास बेदम मारून आखाडा बाळापुर पोलिसांच्या हवाली केले. याबाबत विद्यार्थिनीने तक्रार दिली. यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

तसेच, याबाबतची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दैने यांनी शिक्षण विभागाला दिले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा मुख्याध्यापक भगवान अवचार यास निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा  

SCROLL FOR NEXT