मराठवाडा

विद्यार्थिनींचे ढोल ताशाच्या गजरात बैलगाडी, कार, बुलेटवर मिरवणूक काढत शाळेत स्‍वागत

अमृता चौगुले

जवळाबाजार, पुढारी वृत्‍तसेवा : इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळा बाजार येथे आज शाळेच्या पहिल्या दिवशी मुलींचे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. मुलींना सण-उत्सवाप्रमाणे सजवलेल्या बैलगाडी, कार आणि बुलेटवर मिरवणूक काढण्यात आली. यांच्या स्वागतार्थ रांगोळीही काढण्यात आली. तसेच शाळेच्या गेटवर येणाऱ्या प्रत्‍येक विद्यार्थिनींना हार घालून व औक्षण करून शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला.

यावेळी विद्यार्थिनींचे पुष्पहार घालून स्वागत करताना मुरलीधर अण्णा मुळे, धोंडीराम अंभोरे मुलींचे औक्षण करताना शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बांगर, शितल दशरथे तसेच शाळेचे पर्यवेक्षक हनुमंत सावंत आणि इतर शिक्षक उपस्थित होते. तसेच पाठ्यपुस्तक भाग एक विद्यार्थिनींना वाटप करण्यात आला.

पहिल्या दिवसाचा स्वागताचा व विद्यार्थिनींमध्ये शाळेविषयी उत्साह निर्माण होण्यासाठी हा स्वागताचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे प्रयत्‍न केले.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT