karuna Munde 
मराठवाडा

करुणा मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक

backup backup

बीड, पुढारी वृत्तसेवा ः करुणा मुंडे यांच्या गाडीवर (दि.23) रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. तसेच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एनसीआर (अदखलपात्र) दाखल करण्यात आला आहे.

करुणा मुंडे या शहरातील कॅनॉल रोडवरील उत्तमनगर भागात राहतात. बुधवार दि.23 रोजी रात्री त्या त्यांच्या गाडीतून (एमएच 23 एडी 3461) पीए अजयकुमार देडे याच्यासह मेडीकलवर थायराईडचे औषध आणण्यासाठी निघाल्या होत्या. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना लक्षात आले की गाडीचे टायर पंक्चर आहे. त्यामुळे परत घरी जाण्यासाठी निघाल्या असता तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले व त्यातील एकाने गाडीच्या समोरील काचेवर दगड मारला. यात काच फुटला. तर दुसऱ्या दोघांनी दोन्ही बाजुचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांना दरवाजा उघडला नाही. एव्हढ्यात करुणा मुंडे यांनी 100 नंबर डायल केला. त्या पोलिसांशी संपर्क करत असल्याचे सदर हल्लेखोरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तथून पळ काढला. या बाबत करुणा मुंडे यांनी गुरुवार दि.24 रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल होत तक्रार दिली. त्यानुसार एनसीआर दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT