मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडला जिनिंग मालकाचे पंचवीस लाख लुटले

Shambhuraj Pachindre

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड- भराडी रस्त्यावर दुचाकीवरुन रोकड घेऊन जाणऱ्यांस चोरट्यांनी लुटले. पंचवीस लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास शहरालगत असलेल्या आनंद पार्क जवळ घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

दोन तरूण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियामधून पंचवीस लाख रुपये घेऊन नवनीत जिनिंगकडे जात होते. त्यांना पाठीमागून आलेल्या चोरांनी लाथ मारुन खाली पाडले. पैशांच्या बॅगसह दोघे खाली पडले. ही संधी साधून चोरटे पंचवीस लाख रुपयांची बॅग घेऊन पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली व रस्त्यांवर नाकाबंदी केली. भरदिवसा ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT