मराठवाडा

हिंगोली, सेनगाव बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; शिवसेना-काँग्रेस-भाजप एकत्र

backup backup

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : जिल्हयातील महत्वाच्या असलेल्या हिंगोली व सेनगाव बाजार समिती निवडणुकीत दोन्ही शिवसेना-भाजप व काँग्रेसने एकत्र येऊन राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. हिंगोली बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेचे (शिंदे गट) गजानन घ्यार हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातून बिनवरोध निवडल्या गेले आहेत.

जिल्ह्यात हिंगोलीसह सेनगाव, कळमनुरी, जवळाबाजार बाजार समितीची निवडणुक होत आहे. या निवडणुकीत बाजार समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच पक्षांची धावपळ सुरु झाली होती. विरोधकांच्या देखील एकमेकांसोबत बैठका सुरु असल्यामुळे नेमके चित्र काय राहणार याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. दरम्यान या निवडणुकीत प्रत्येक बाजार समितीच्या 18 जागांसाठी कळमनुरीत 71, हिंगोलीत 137, सेनगाव 151 तर जवळाबाजार मध्ये 184 उमेदवारांनी उमेदवादी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न चालविले होते. त्यासाठी मागील काही दिवसांत बैठकाही झाल्या आहेत. तर निवडणुक बिनविरोध करण्यावरही चर्चा झाली होती. मात्र निवडणुक बिनविरोध करण्याचे प्रयत्न यशस्वी झालेच नाहीत. मात्र हिंगोली व सेनगाव या महत्वाच्या बाजार समितीच्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते. या दोन्ही बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), भाजपा व काँग्रेसची युती झाली आहे. या युतीमुळे या दोन्ही बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीला दे धक्का बसला आहे. या प्रमुख पक्षांच्या युतीमुळे राष्ट्रवादीची स्थिती दयनिय झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. दरम्यान, गुरूवारी उमेदवारी अर्ज माघारीनंतर हिंगोलीत आर्थिक दृष्टया दुर्बल घटक मतदार संघातून शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार गजानन घ्यार बिनविरोध निवडून आले आहेत. त्या निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी प्रस्थापितांच्या विरोधात लढणार

या निवडणुकीत राष्ट्रवादीला अलगद बाजूला केल्यामुळे सैरभैर झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी आता पक्ष बाजूला ठेऊन प्रस्थापितांच्या विरोधात परिवर्तन आघाडी निवडणुक रिंगणात उतरवली आहे. यामध्ये इतर पक्षातील असंतुष्टांना सोबत घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT