मराठवाडा

पाणीटंचाई ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; २० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेल्या नाथसागर धरणातून

backup backup

पैठण; पुढारी वृत्तसेवा :  पैठण येथील नाथसागर धरणातून प्रथम उन्हाळा हंगामासाठी पाणी उजवा कालव्यातून विसर्ग सोमवारी रोजी रात्री सुरू करण्यात आला. हा निर्णय पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी घेतला. यामुळे भूषण पाणीटंचाईच्या चिंतेमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नाथसागर धरणातून उन्हाळा हंगामासाठी ठरलेल्या पाणी पातळी अनुसार उजवा कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी बीड पाटबंधारे क्र.३ विभागाचे कार्यकारी अभियंता वि. वि नखाते यांनी केल्यामुळे पैठण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव धरण उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी सोमवार रोजी रात्री धरणाच्या उजवा कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती धरण उपविभागीय अभियंता विजय काकडे यांनी दिले असून सदरील पाणी पाथरवाला जिल्हा जालना बंधारा करित सोडण्यात आले असून. आज रोजी नाथसागर धरणामध्ये पाणी पातळी ४५८. ०६३ मीटरमध्ये नोंद असून या पाण्याची टक्केवारी २०.६१ आहे. मागील वर्षी धरणातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी ६१.२१ होती. धरणात बाष्पीभवन १.०७७ होत आहे. यासह डावा कालव्यातून १९००. क्युसेक पाण्याचा निसर्ग यापूर्वी सुरू आहे.

SCROLL FOR NEXT