पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालूक्यातील गोविंदपूर येथील एका विवाहितेच्या पतीच्या मोबाईलवर मित्रासोबत काढलेले फोटो व अश्लील भाषेत मेसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. अनिल विठ्ठलराव उखळतकर (रा.बरबडी) असे संशयिताचे नाव आहे.
फिर्यादी विवाहित महिलेस तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझे मित्रासोबत काढलेले फोटो व्हायरल करतो. असे म्हणत तीन ते चार वर्षापासुन सतत संपर्क करुन त्रास दिला. महिलेच्या पतीला मोबाईलवर मित्रासोबत काढलेले फोटो टाकून व अश्लील भाषेत मेसेज पाठवून विनयभंग केला. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ देखील केली. म्हणून उखळतकर याच्या विरोधात चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार काकडे करत आहेत .
हेही वाचा :