रमाबाई चिकाटे यांचा खून झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तपासाला सुरूवात केली.  Pudhari Photo
परभणी

पूर्णा येथे महिलेचा निर्घृण खून; विजयनगरजवळ मृतदेह फेकला

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: एका महिलेचा डोक्यात, डोळ्यावर, डाव्या पायावर घाव घालून निर्घृण खून केल्याचा प्रकार आज (दि.१४) सकाळी १० वाजता उघडकीस आला. महिलेचा मृतदेह विजयनगर कॉर्नर जवळील रेल्वेच्या रिकाम्या काटेरी जागेत आढळून आला. रमाबाई अनिल चिकाटे (वय ५०, रा. सिध्दार्थनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा श्याम अनिल चिकाटे यांनी फिर्याद दिली आहे. (Parbhani Crime News)

या घटनेची वार्ता वा-यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत‌ काळे, किशोर काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, स्थानिक गुन्हा शाखा जिल्हा पथक प्रमुख अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सपोनि सोमनाथ शिंदे, फौजदार ईंगोले, माने बोईनवाड, रमेश मुजमुले दाखल झाले. श्वानपथक, फॉरेन्सिक लॅब पथकास पाचारण करुन घटनास्थळाची पाहणी केली. (Parbhani Crime News)

या प्रकरणी अज्ञात मारेक-याविरुध्द पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विजयनगर, हरिनगर व रेल्वे वसाहत परिसरात भीतीचे वातावऱण पसरले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगावकर करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT