परभणी : गळा आवळून खून केल्याप्रकरणी दोन जणांना जन्मठेप file photo
परभणी

परभणी : गळा आवळून खून केल्याप्रकरणी दोन जणांना जन्मठेप

पुढारी वृत्तसेवा

परभणी, पुढारी वृत्तसेवा : रांजोना (ता. वसमत) येथील दोघांनी तेथील मारोती साळवे नावाच्या मित्रास सोबत घेऊन त्याचा परभणी तालुक्यातील लोहगाव येथे गळा आवळून खून करीत मृतदेह कॅनलमध्ये फेकून दिला होता. याप्रकरणी दोघा जणांना जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांनी ठोठावला आहे.

याबाबत माहिती अशी की, रांजोना येथील मारोती साळवे हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दि.६ जून २०२० रोजी हट्टा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरून हट्टा ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मोरे व हवालदार शेख नय्यर यांनी त्यांची चौकशी सुरू केली. त्यावेळी मारोती याचा खून झाल्याची माहिती त्यांना मिळाल्यावरून त्यांनी गावातील संशयित म्हणून देविदास सटवाजी साळवे व गजानन मुरलीधर साळवे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मारोती साळवे यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.

त्याचा मृतदेह लोहगाव शिवारात कॅनलमध्ये टाकून दिल्याचीही कबुली दिल्यावरून पोलिसांनी दि.७ जून २०२० रोजी ताडकळस पोलीस ठाण्यात यापकरणी गुन्हा दाखल दाखल केला होता.या दरम्यान मारुती साळवे यांचा मृतदेह सापडून अंत्यसंस्कारही झाले होते मात्र त्याचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर या दोघांनी दिलेल्या कबुलीवरून ताडकळसचे निरीक्षक वसत मुळे यांनी तपास करून आरोपींची कबुली व गुन्ह्यात वापर- लेल्या वस्तू जप्त करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी आठ साक्षीदार तपासले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांनी देविदास साळवे व गजानन साळवे यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास व कलम २१ नुसार पाच वर्षे सश्रम कारावास आणि तीन महिने तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्या दरम्यान देविदास साळवे याचा मृत्यू झाल्याचे कळवले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT