सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले File Photo
परभणी

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले

पुढारी वृत्तसेवा

ताडकळस : पुढारी वृत्तसेवा

खंडाळा ता. पुर्णा येथील कृष्णा मुधोळकर याने त्याच्या पत्नीला तुला मुलगा होत नाही म्‍हणून बोल लावला. तसेच ट्रॅक्‍टरचे पैसे फेडण्यासाठी तुझ्या माहेरहुन एक लाख रुपये घेऊन ये म्हणून पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या रोजच्या त्रासाला कंटाळून खंडाळा येथील खदानीतील पाण्यात उडी घेऊन विवाहितेने जीवन संपवले. ही घटना ताडकळस पासून जवळच असलेल्या खंडाळा ता. पुर्णा येथे दि ३१ ऑगस्‍ट रोजी घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, १५ जानेवारी ते ३१ सप्टेंबर दरम्यान खंडाळा येथील मंजुषा कृष्णा मुधोळकर (वय २५) या विवाहितेला तिच्या पतीने व सासु सासरऱ्यासह सहा जणांनी संगनमत करून तुला मुलगा होत नाही म्‍हणत टोमणे मारले. तसेच ट्रॅक्‍टरचे पैसे फेडण्यासाठी तुझ्या माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये म्‍हणत वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून तिला शिवीगाळ करत होते. या सर्वांच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने खंडाळा येथील गणेश सोळंके यांच्या खदानीतील पाण्यात उडी मारुन जीवन संपवले.

या प्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींच्या विरोधात सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांच्या आदेशाने विवाहितेचा पती कृष्णा मुधोळकर, सासरा मशन्ना मुधोळकर, सासु चिमुताई मुधोळकर, पुजा कुसरे, सपना मुधोळकर, गोपी मुधोळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काठेवाडे हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT