मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शाखा अज्ञात चोरट्यांनी फोडली. ही घटना शुक्रवारी (दि.23) घडली. या चोरी दरम्यान तिजोरीतील सुमारे साडेतीन लाख रुपये लंपास केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील रामेटाकळी येथे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. चोरट्यांनी गुरुवारी (दि.२२) मध्यरात्रीनंतर बँकेच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करून बँकेतील तिजोरी तोडून त्यात ठेवलेली ३ लाख ५२ हजार २०० रुपये चोरून नेले. याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक वैजनाथ जाधव (वय.५६) राज्ञानेश्वर नगर पाथरी यांचे फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताटे करीत आहेत.