भरदिवसा ४ लाखांची रोकड चोरट्याने पळविली 
परभणी

परभणी : भरदिवसा ४ लाखांची रोकड चोरट्याने पळविली

पोलिस ठाण्याच्या जवळील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड : बँकेतून ३ लाख ८८ हजाराची रोकड काढून मोपेडवरून घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यानी रोकड असलेली पिशवी हिसकावून घेत तेथून धूम ठोकली. ही घटना बुधवारी (दि.१२) दुपारी २ च्या सुमारास शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली. ऐन पोलिस ठाण्यासमोरच भरदिवसा हा प्रकार घडल्याने चोरट्यानी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बाळासाहेब शिंदे यांनी बुधवारी दुपारी गंगाखेड येथील बँकेतून ३ लाख ८८ हजाराची रक्कम काढली. व ते स्कुटीवरून घरी निघाले होते. यादरम्यान पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानी हिसका देत त्यांच्याकडील रोकडची पिशवी घेऊन ते काही क्षणात धूम स्टाईलने पसार झाले. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हा प्रकार घडला. त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ गंगाखेड पोलिस ठाण्यात धाव घेतली. प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक शिंदे यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलिसांकडून शहरात चोरट्यांचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT