डॉ जयप्रकाश मोदाणी, अध्यक्ष व्यापारी असोशियन मार्केट कमिटी पूर्णा. Pudhari Photo
परभणी

पूर्णेत सोयाबीनचे भाव गडगडले!

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात नवीन सोयाबीनची आवक सुरु झाली आहे. मात्र, सोयाबीनचे भाव गडगडले आहेत. याबरोबरच सोयाबीनचे लिलाव होत नसल्यामुळे दुकानदार, व्यापारी यांच्यासह शेतकरीही हैराण झाले आहेत. सध्या येथील मार्केटमध्ये प्रति क्विंटल ४२०० ते ४३०० रुपयेच सोयाबीनला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीस काढत नसल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. मागील सहा महिन्यापासून सोयाबीनचा दर प्रती क्विंटल ४००० ते ४३०० रुपयानेच विकत आहेत. मात्र नवीन सिझन चालू होवूनही दर वाढला नाही. सोयाबीनला सोयातेल मिलचा दर ४५५० ते ४६२५ च्या वर जात नसल्याने आडतीवर दर वाढून मिळत नाहीत.

शेतक-याच्या सोयाबीनला मार्केट कमिटी यार्डात आडतीवरच चांगला दर मिळत असताना पणन मंडळाने भुसार दुकानदारास थेट शेतमाल खरेदीचे परवाने दिल्याने आडत दुकाने व्यवहारा विना ठप्प झालेत.बाहेरील भुसार दुकानदारवर सहकार खात्याचे उपनिबंधक,निबंधक यांचा वरदहस्त मिळू लागल्याने ते पणन मंडळाचे नियम धाब्यावर बसवत आहेत.परिणामी,आडतीवर सोयाबीन आणलेल्या बिछाईतदार शेतक-यांची पंचाईत होत आहे.यातच ऐन सोयाबीन सिझनमध्य शुध्दा हमी दरापेक्षा कमी दराने सोयाबीनला कमी भाव मिळत आहे.त्यामुळे येथील मार्केट कमिटी यार्डात दररोज २५ हजार क्विंटल होणारी सोयाबीनची आवक लिलावा अभावी ठप्प होत आहे.कमी दर मिळत असल्याने शेतकरी सोयाबीन न विकता निदान ५ हजार रु.क्विंटल दराची प्रतिक्षा करीत आहे.

शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे मार्केट समितीसमोर सहकार व पणन मंडळा व्दारे भुसार दुकानदारास थेट शेतमाल खरेदीचे परवाने देवून आडत दुकानदारावर गडांतर आले आहे. थेट खरेदीदार दुकानदाराकडेच शेतकरी सोयाबीन विक्रीस घेऊन गळचेपी करुन घेताहेत. हे खरेदीदार पणन मंडळाने घालून दिलेले नियम न पाळता बेकायदेशीर सोयाबीनची खरेदी करु लागलेत. सहकार खात्याचे डिडीआर,एआर हे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत भुसार दुकानदारास घालून दिलेले नियम पाळावयास न लावता उलट त्यांची पाठराखण करत आहे.कायदेशीरपणे शेतीमाल खरेदी करणा-या कमिशन एजंट आडत दुकानदारास वाचवायचे असेल तर बाहेरील भुसार थेट खरेदीदाराचे परवाने रद्द करुन त्यांना मार्केट कमिटी अंतर्गत व्यवसाय करायला लावणे गरजेचे आहे.

- डॉ. जयप्रकाश मोदाणी (अध्यक्ष व्यापारी असोशियन मार्केट कमिटी पूर्णा)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT