झरी येथे तणाव झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. pudhari photo
परभणी

Parbhani News : झरी येथे आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव

वेळेवर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

परभणी/झरी : तालुक्यातील झरी येथे मंगळवारी (दि.3) सायंकाळी समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओवरून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाला. वेळेवर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असून सध्या गावात शांतता प्रस्थापित झाली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोई गल्ली परिसरातील एका युवकाने ऐतिहासिक व्यक्ती टिपू सुलतान यांच्याशी संबंधित होळीमध्ये जाळत असल्याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग््रााम व व्हॉट्‌‍स ॲप स्टेटसवर अपलोड केला होता. संबंधित व्हिडिओ आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत काही मुस्लिम युवकांनी तो तत्काळ हटविण्याची मागणी केली. यासाठी ते संबंधित युवकाच्या घरी गेले असता दोन्ही गटांत शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने काहीकाळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, होळीच्या पार्श्वभूमीवर झरी येथे आधीच पोलिस बंदोबस्त तैनात होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, ग््राामीण ठाण्याचे सपोनि. जीवन राजगुरू, ताडकळस ठाण्याचे गजानन मोरे तसेच गंगाखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला.

रात्री सुमारे एक वाजेपर्यंत परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आली. याप्रकरणी पोलिस शिपाई नवनाथ यांच्या फिर्यादीवरून रोहित आडणे, वैभव शिरडकर, शेख आसेफ शेख सुलतान, शाकेर अयुब पठाण, सय्यद मोबीन सय्यद अमिन, शेख असलम व अन्य चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेतील सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गावात अफवा पसरू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे व कोणतीही आक्षेपार्ह माहिती समाज माध्यमावर प्रसारित न करण्याचे आवाहन केले आहे. तपास सपोनि.जीवन राजगुरू हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT