Take money from the opposition; but give votes to the Congress MP Imran Pratagadi
पाथरी, पुढारी वृत्तसेवा विरोधक तुम्हाला पैशाच्या ताकदीवर विकत घेऊ पाहत आहेत, विरोधकांचे पैसे घ्या, पण मतदान काँग्रेसला करा असा सल्ला खा. इमरान प्रतापगडी यांनी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत दिला.
पाथरी नगर पालिका निवडणुकीत काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत खा. इमरान प्रतापगडी बोलत होते. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबाजानी दुर्राणी, नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी व मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलताना खा. प्रतापगडी म्हणाले की, नगर पालिका निवडणुकीत विरोधक हातात दगड, चाकू घेऊ लागले आहेत. पाथरी शहर हे सुसंस्कृत लोकांचे शहर असून द्वेषाला व्देषाने नाही तर प्रेमाने जिंकता येते. माजी आ. बाबाजानी दुर्राणी मागील ३५ वर्षांपासून लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. एवढे वर्ष कोणी कुणाला सहज स्वीकारत नाही. पालिकेची निवडणूक ही मोठी लढाई असून मतांचे विभाजन होऊ देऊ नका. तुमच्या मतविभाजनाचा फायदा अप्रत्यक्ष भाजपलाच होणार असल्याचे खा. प्रतापगडी म्हणाले.
मुंबईवरून आलेले काहीजण शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत थारा देऊ नका असेही खा. प्रतापगडी म्हणाले. काँग्रेसचे नगराध्यक्षाचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी यांच्या विर- ोधात विरोधक एकवटले असून मतदारांना विकत घेऊ पाहण्याचे विर-असून, विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.
काही लोकांना जातीय सलोखा बिघडवायचा आहे: बाबाजानी दुर्राणी
४० वर्षापासून आपण शहरात शांती व जातीय सलोखा कायम ठेवला. जाती-जातीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ दिले नाही. सर्वधर्मीय उत्सवांत आम्ही पोलीसांचीही गरज पडू दिली नाही, परंतु आज विरोधकांकडून शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी गंगाखेड येथील सभेत बाबाजानी दुर्राणी यांच्यावर टीका केली होती, त्या टीकेला उत्तर देताना बाबाजानी यांनी मलिक आपले सहकारी होते, त्यांनी आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करू नये. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप झाल्याची आठवणही बाबाजानी दुर्राणी यांनी करून दिली.
जुनेद खान दुर्राणी दमदार भाषण
कॉंग्रेसचे नगराध्यक्षपद उमेदवार जुनेद खान दुर्राणी यांनी म्हटले की, बाबाजानी दुर्राणी यांनी ४० वर्षात शहराला विकासाच्या उंचीवर नेले. सर्व धर्मीयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु आज शिवसेना-भाजप हे जाती धर्मामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही जुनेद खान दुर्राणी यांनी केला.