ताडकळस : येथील नागरीकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे म्हणून केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. जल स्वराज्यनंतर ग्रामीण भागात कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करुन जल जीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. परंतु ग्रामीण भागातील अनेक गावात जलजीवन मिशनचे गेल्या दोन वर्षांपासून कासवाच्या गतीने कामे चालत असल्याने अर्धवट कामे राहिली असल्याने ताडकळस येथील नागरिकांना यावर्षी भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
ताडकळस येथे सध्या पाण्यासाठी ग्रामस्थांना रात्रंदिवस वणवण भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात तांत्रिक बिघाडामुळे नळाला पाणी महीन्याला पंधरा दिवसाला नळाला पाणी येत आहे. गोदावरी नदीवरील डिग्रस बंधारा महागाव ता पुर्णा येथे पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीला भरपुर पाणी असुनही पाणी पुरवठा होत नसल्याने ताडकळसच्या नागरीकातुन तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ताडकळस येथील जल जीवन मिशनच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु ताडकळसवासियांच्या पदरात उपेक्षाच पडली आहे. घरोघर नळ असून सुरळीत पाणीपुरवठा कधी होणार असा संतप्त प्रश्न ताडकळसच्या नागरीकातून उपस्थित होत आहे.
पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कार्यालय असलेल्या ताडकळस येथे शासनाच्या वतीने जवळपास ९ ते 10 कोटी रुपये खर्च करून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गोदावरी नदीवर महागाव येथे नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. ताडकळस येथुन ८ किमी अंतरावर असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर महागाव येथे नविन गोदावरी नदीच्या काठावर विहीर खोदुन लोखंडी पाईप लाईन निर्माण करुन गावात आणली आहे. तसेच नवीन पाण्याचा जलकुंभ तयार केला असून या योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण करण्यासाठी यंत्र सामुग्री देखील बसविण्यात आली आहे.
परंतु तांत्रिक बिघाडामुळे नेहमीच कधी कधी तर १५ ते 1 महीना दिवस पाणीपुरवठा बंद होत नसुन पाणी पुरवठा झाला तर १० ते १२ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. सदरील योजना ग्रामपंचायत कार्यालयाकडे हस्तांतरित झाली नसल्याचे कळते दुरुस्तीची कामे संबंधित गुत्तेदारांना करावी लागत आहेत. परंतु हा गुतेदार हे काम कधी फायल करनार याला काही मर्यादा आहेत का नाही या सर्व प्रकारामुळे सध्या ताडकळस गावात सर्वत्र भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नळाचा पाणी पुरवठा देखील बंद असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी रात्रंदिवस भटकंती भटकंती करावी लागत आहे.
विशेष म्हणजे केंद्र व राज्य शासन ग्रामीण भागातील नागरीकांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी जल स्वराज्य नंतर जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याचे कामे करण्यात येत आहेत. गाव पातळीवरील लोकसंख्येच्या आधारे शासनाने कोट्यावधीचा निधी जलजीवन मिशन योजनेला प्राप्त झाले आहेत. गेल्या दोन वर्षापासून संबंधित गुत्तेदाराकडून नवीन जलकुंभ, प्रत्येक कुटूंबाला नळ जोडणी व जलशुध्दीकरण यंत्र बसविण्यात आले आहेत. जलजीवन मिशनमुळे ग्रामस्थांना शुध्द व मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून होत होती. परंतु मे महिना संपत आला तरी अनेक ठिकाणी अर्धवट कामे राहिली आहेत. सध्या ग्राम पंचायत कार्यालयाचा कारभार प्रशासकाकडे असल्याने निधी खर्च करण्यासाठी देखील अडथळा निर्माण होत आहे. या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांना यावर्षी पुन्हा भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित पाणी पुरवठा विभागाचे वरीष्ठ अधिकारी व प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ मिळेल का ॽलक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ताडकळस येथील नागरिकांमधून होत आहे.