परभणी : साऊथ सेंट्रल रेल्वे, नांदेड विभाग यांच्या वतीने पॉइंट्समन या पदासाठी करार पध्दतीने रेल्वे भरती घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी मूळ कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी आहे. विहित तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. मूळ वेतन 18 हजार रुपये, त्यासोबत महागाई भत्ता, प्रवास भत्ता व घरभाडे भत्ता लागू असणार आहे. माजी सैनिकाने किमान 15 वर्षे सैन्यात सेवा केलेली असावी. तसेच शैक्षणिक पात्रता किमान 10 वी उत्तीर्ण अथवा आय.टी.आय / एन.सी.व्ही.टी ची तत्सम पदवी असावी, वय 55 वर्षांपेक्षा कमी असावे, निवड झाल्यानंतर आरोग्य तपासणी घेण्यात येईल असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.