परभणी

Maratha Reservation Agitation : मराठा आंदोलनासाठी सेलुत राजकीय पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

अनुराधा कोरवी

सेलू , पुढारी वृत्तसेवा : सेलू तालूक्यात अनेक गावात राजकीय नेत्यांना गावंबदी केली आहे. तसेच तालुक्यातील अनेक राजकीय पक्ष पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा आंदोलनात सहभागी झाले आहेत. ( Maratha Reservation Agitation )

मनोज जंरागे- पाटील यांना पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाज एकवटला आहे. सेलूतील टिळक पूतळा येथे साखळी उपषोनाचा आजचा सहावा दिवस आहे. तसेच चार आंदोलनकर्त्यांनी तर मागील दोन दिवसापासून अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. आज त्यांची वैधकीय तपासणी करण्यात आली. या साखळी उपषोनात दररोज रात्री ८ ते १० या वेळे हरीकिर्तन होत आहे. या आंदोलनात सेलू तालूक्यातील सकल मराठा समाजाने पूढाकार घेतला असून प्रत्येक गावागावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. दरम्यान आपआपल्या पक्षातील पदाचे राजीनामे देत शासनाचा निषेध नोंदवला आहे आणि गावागावात राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी करत शासनाला जाब विचारत पुढील काळात हे आंदोलन अजून तीव्र होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.

राम पाटील ( शिवसेना सेलू जिंतूर पक्ष बूथ प्रमूख), मनिष कदम ( शहर प्रमूख शिवसेना ), रघूनाथ बागल ( शहर अध्यक्ष राष्र्टवादी शरद पवार गट), जयशिंग शेळके ( भा.ज.प.जिल्हा कार्यकरणी सदस्य), सौ. निर्मला लिपने ( महिला ता. अध्यक्ष राष्र्टवादी पवार गट), गूलाब खेडेकर ( शिवसेना ता.सेलू ), पप्पू शिंदे ( उपशहर अध्यक्ष राष्ट्रवादी पवार गट) यांनी आपआपल्या पदाचा राजीनामा दिला आणि जोपर्यत आरक्षण मिळत नाही तो पर्यत कोणत्याही, पक्षाचे काम करणार नसल्याची माहिती दिली आहे.

तसेच अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी मराठा समाज्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सकल मराठा समाज्याकडून करण्यात आले आहे. शहरातील साखळी उपषोणास पाठिंबा वाढत असून साखळी उपषोणस्थळी रोज रात्री हरी नामाचे किर्तन होत आहेत. सेलू तालुक्यात राजकीय नेत्यांना गावबंदी केल्यामुळे या नेत्यांचा समाजाला पांठीबा नसेल तर मतदान पण नसेल अशी भूमिका घेतल्याची चर्चा सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे.

आंदोलनाला मेडीकल असोसियनकडून पाठिंबा

सेलू शहरात सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणास शहरातील केमिस्ट मेडीकल असोसियन, सेलू वकिल संघ, डाँक्टर असोसियन, अशा अनेक असोसियनकडून पाठीबा दिला आहे. ( Maratha Reservation Agitation )

SCROLL FOR NEXT